नागपूर- वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रचित सारंग ठाकरे, असे या मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.
वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू - Nagpur latest news
हे गोंडस बाळ नेहमीप्रमाणे आईच्या आजूबाजूला घरात खेळत होते. त्यावेळी त्याच्या आईने त्याला वॉकरमध्ये ठेवले. त्यावेळी हे बाळ वॉकर धरून चालत होते. तेव्हा आई आपल्या कामात असताना रचित वॉकरमधून डोक्यावर पडला.
रचित सारंग ठाकरे
याबाबत अधिक माहिती अशी की, हे गोंडस बाळ नेहमीप्रमाणे आईच्या आजूबाजूला घरात खेळत होते. त्यावेळी त्याच्या आईने त्याला वॉकरमध्ये ठेवले. त्यावेळी हे बाळ वॉकर धरून चालत होते. तेव्हा आई आपल्या कामात असताना रचित वॉकरमधून डोक्यावर पडला. त्यानंतर त्याला त्याच्या आईने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर ट्रामा सेंटरमध्ये 3 दिवस उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा आज मृत्यू झाला.