महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खामला परिसरात एकाच रात्री ३ एटीएम फोडण्याचा प्रयत्न - 4 ATM in one night

नागपूर शहरात एकाच रात्री चार एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील खामला परिसरात अवघ्या एक किलोमीटर अंतरावर या चार एटीएम आहेत. हा परिसर प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येतो.

खामला परिसरात एकाच रात्री ४ एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

By

Published : Aug 22, 2019, 5:01 PM IST

Updated : Aug 22, 2019, 11:43 PM IST

नागपूर - शहरात एकाच रात्री तीन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील खामला परिसरात बुधवारी ही घटना घडली आहे. हा परिसर राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. बाईकवरुन आलेल्या भामट्यांनी आरी आणि हातोडीच्या मदतीने या एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

खामला परिसरात एकाच रात्री ४ एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 3 ते 4 वाजल्याच्या सुमारास काही अज्ञात आरोपींनी खामला परिसरातील एसबीआय सह अन्य बँकेच्या एटीएम मशिन्स फोडून त्यातील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी भरपूर प्रयत्न करून सुद्धा मशीन फोडण्यात अपयश आल्यानंतर आरोपींनी पोबारा तिथून पोबारा केला. ज्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला त्या एटीएम सेंटर बाहेर एकही गार्ड उपस्थित नसल्याचे समोर आले आहे.

आज (गुरुवारी) सकाळी या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी दाखल होऊन यासंदर्भात बँकेला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर बँकेने एटीएम मशीनमधून रक्कम चोरीला गेली नसल्याचा निर्वाळा दिल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या संदर्भात पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे

Last Updated : Aug 22, 2019, 11:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details