नागपूर - ड्युटी पूर्ण करून घरी निघालेल्या पॅरा-मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर (इंटर्न) एका माथेफिरूने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने बंदुकीतून गोळी फायर न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातील अधिष्ठाता कार्यालय परिसरात ही घटना घडली. (government medical college nagpur) आरोपीचे नाव विक्की चाकोले, असे आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेला असून त्याला अटक करण्यासाठी अजनी पोलीस ठाण्याचे (ajani police station) आणि गुन्हे शाखेचे तीन पथक (nagpur crime branch) रवाना करण्यात आले आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
पीडित तरुणी ही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिक्षणासाठी ती नागपूरला राहते. तर आरोपी विक्की चकोले हा नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाली असताना आरोपी हा पार्किंगमध्ये तिची वाट बघत होता. ती गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेली असता आरोपीने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापले विक्कीने तिच्यावर बंदूक रोखली. आरोपीने दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी बंदुकीत लॉक झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी मेडिकल मध्ये तैनात असलेले कर्मचारी तेथील जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली तोपर्यंत आरोपी विक्की घटनास्थळावरून फरार झाला होता.
पोलीस घटनास्थळी दाखल -