नागपूर- कौटुंबिक करणातून सासू सोबत झालेल्या वादात एका महिलेने स्वतःच्या मुलाला विष देऊन त्यानंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या ( Attempted Suicide by Drinking Poison ) करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर महिलेचा जीव थोडक्यात वाचला आहे. ही घटना नागपूरच्या रामटेक तालुक्यातील बनपुरी येथे घडली आहे. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी ( Ramtek Police ) महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सासूसोबत झाले कडाक्याचे भांडण -
प्रणाली (वय २२) रामकृष्ण धावडे असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर वेदांत रामकृष्ण धावडे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सकाळी प्रणालीचे तिच्या सासू सोबत कडाक्याचे ( Domestic Dispute in Nagpur ) भांडण झाले. त्यानंतर घरातील सर्व मंडळी शेतात कामासाठी निघून गेले. दरम्यान सासू सोबत झालेल्या भांडणाच्या रागातून प्रणालीने स्वतःच्या दीड वर्षीय वेदांतला विष पाजले. त्यानंतर स्वतः देखील विष घेतले. वेदांतचा काही वेळातच मृत्यू तर महिलेला शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. तात्काळ उपचार मिळाल्याने प्रणाली थोडक्यात बचावली आहे. तिच्यावर रामटेक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.