नागपूर- शहरात वाढत असणाऱ्या गुन्हेगारी विरुद्ध मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशात मंगळवारी दुपारच्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीतील संविधान चौकात कर्तव्य बजावताना पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी यांच्यावर हल्ला झाला आहे.
हेल्मेट न घातल्याने जाब विचारणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला - nagpur
या प्रकरणानंतर लगेचच हल्लेखोर मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान प्रकरणाचा तपास सदर पोलीस करत आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी
चौधरी यांनी हेल्मेट न घातल्यामुळे वाहन चालकाला थांबविले आणि त्याच्याकडून लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. आपल्यावर कारवाई करत असल्याचे पाहून आरोपी मोहम्मद अन्सारी याने पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांना धक्काबुक्की करत चावीने हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणानंतर लगेचच हल्लेखोर मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान प्रकरणाचा तपास सदर पोलीस करत आहेत.