नागपूर -जिल्ह्यातील नरखेड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. सोमवारी रात्री त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असून राजेश मोरे असे त्यांचे नाव आहे.
नागपूर : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या - राजेश मोरे
जिल्ह्यातील नरखेड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
![नागपूर : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4184782-668-4184782-1566273531857.jpg)
प्रतिकात्मक छायाचित्र
मोरे यांच्या आत्महत्येमागील कारणांचा सध्या उलगडा झालेला नाही. त्यांचे कुटुंबीय बाहेर गेले असताना त्यांनी हे टोकाचे पाउल उचलले. ते नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक ही नागपूर जिल्ह्यातील नरखेड पोलीस ठाण्यात होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून राजेश मोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी रवाना करण्यात आला आहे.
Last Updated : Aug 20, 2019, 10:26 AM IST