नागपूर- भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशू कक्षात असलेल्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेतून राज्य सरकारने बोध घेतला असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडूच नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात लेखापरिक्षण (ऑडीट) केले जाईल. मात्र, या घटनेमुळे निष्काळजीपणा केल्यास त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतात या असा संदेश व्यवस्थेला मिळाला असल्याचेही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे देखील भंडारा येथे जाण्यासाठी नागपूरवरून रवाना झाले आहेत. त्याआधी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, भंडाराचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह विमानतळावर सुमारे तास भर चर्चा केली.
काय आहे प्रकरण..?