नागपूर- भाजप-सेना युतीच्या उमेदवारविरोधात शिवसेनेच्या माजी आमदाराने दंड थोपटले आहे. आशिष जयस्वाल नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
हेही वाचा - कामठीतून बावनकुळेंनाच उमेदवारी द्या; सुलेखा कुंभारेंची जाहीर मागणी
याबाबत आशिष जयस्वाल यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. युतीमध्ये रामटेकची जागा शिवसेनेकडे होती. येथून 2004 व 2009 च्या निवडणूकीत शिवसेनेकडून आशिष जयस्वाल निवडून आले होते. मात्र, 2014 मध्ये युती तुटल्यावर भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडून ते पराभूत झाले होते.
आशिष जयस्वालांची फेसबुक पोस्ट हेही वाचा - डान्स बारमध्ये सापडलेल्यांना तुम्ही तिकीट देता; भाजपमध्ये नागपुरातच बंडखोरीची शक्यता
यंदा रामटेकची जागा भाजप सेनेसाठी सोडणार नसल्याची चर्चा असल्याने अखेर जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार रेड्डी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जयस्वाल हे खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.