नागपूर- रत्नागिरी येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाला कोकणी जनतेचा आणि शिवसेनेचा विरोध असल्याने हा प्रकल्प विदर्भात पाठवा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.
नाणार प्रकल्प विदर्भात आणावा आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रत्नागिरी येथील नाणार प्रकल्पाला तेथील जनतेचा विरोध असल्याने तो प्रकल्प विदर्भात पाठववा, अशी मागणी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मागणीचे निवेदनही दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सूचनाही दिल्या आहेत. माजी आमदार आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणीही गेल्या वर्षी केली होती. हा प्रकल्प विदर्भात आल्यास विदर्भातील उद्योगधंद्यांना व विकासाला गती मिळेल आणि रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. देशात भटिंडा, दिल्ली, पानिपत, गुवाहाटी या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आधीपासून अस्तित्वात आहेत. ते सागरी बंदरांशी त्या पाईपलाईनने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भात देखील असा प्रकल्प होऊ शकतो, असेही देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याने ते यावरही सकारात्मक विचार करतील, असा विश्वासही देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचे नागपुरात भव्य स्वागत