नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांना पळकुटा असल्याचे संबोधल्यानंतर आज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. देवेंद्र फडणवीस आम्हाला पळपुटे आणि कोल्हे म्हणत असतील, तर ते उच्च आहेत, हे त्यांनी सिद्ध करावे. ते मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी सामान्य जनतेला काहीही बोलावे, हे जनता खपवून घेणार नाही. या निवडणुकीत जनता त्यांना पराभूत करेल, असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' टीकेला आशिष देशमुखांचे प्रत्युत्तर - काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी संबोधित केलेल्या सभेत काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांच्यावर पळकुटा आल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा - खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम - थोरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी संबोधित केलेल्या सभेत काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांच्यावर पळपुटा आल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, काँग्रेसने माझ्या विरोधात उमेदवारही असा दिला, जो पळपुटा आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधातही पळपुटा उमेदवार दिला होता. त्यामुळे आम्हाला निवडणूक लढण्यात मजाच येत नाही, असे फडणवीस म्हणाले होते. यावर आज काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे.