नागपूर - महामेट्रोने आचारसंहितेच्या काळात कर्माचाऱ्यांची पदोन्नती केली. त्यामुळे महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जयजवान जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर यांनी केली आहे.
'नागपूर मेट्रोच्या संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा'
आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही शासकीय उपक्रमामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे किंवा त्यांना पगारवाढ देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वनकर म्हणाले.

सीताबर्डी ते खापरी या मार्गावर गेल्या ७ मार्चला मेट्रो सुरू करण्यात आली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळेच मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी मेट्रो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली, असा अध्यादेश मेट्रोने ८ मार्चला काढला. त्यामुळे ही पदोन्नती आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.