महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरुण गवळीची संचित रजा लांबणीवर, २३ एप्रिलला होणार सुनावणी - april-23

गेल्या माहिन्यात २१ मार्चला या प्रकरणी सुनावणी झाली असता सरकारी पक्षांनी न्यायालयापुढे वेळ मागितली होती.  आताच्या सुनावणीमध्ये पण सरकारी पक्षांनी वेळ मागितली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहे.

अरुण गवळीची संचित रजा लांबणीवर, २३ एप्रिलला होणार सुनावणी

By

Published : Apr 16, 2019, 1:53 PM IST

नागपूर - कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजेकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सरकारी पक्षाने उत्तर दाखल करण्याकरता अतिरिक्त वेळेची मागणी न्यायालाय पुढे करत २३ एप्रिल पर्यंतची वेळ मागून घेतली आहे. कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. मात्र, कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळीने न्यायालयात धाव घेतली.

अरुण गवळीची संचित रजा लांबणीवर, २३ एप्रिलला होणार सुनावणी

गेल्या माहिन्यात २१ मार्चला या प्रकरणी सुनावणी झाली असता सरकारी पक्षांनी न्यायालयापुढे वेळ मागितली होती. आताच्या सुनावणीमध्ये पण सरकारी पक्षांनी वेळ मागितली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्येप्रकरणात डॅडी उर्फ अरुण गवळी २०१८ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details