नागपूर -विदर्भासाठी दिलासादायक बातमी आहे. साधारणतः १५ जूननंतर दाखल होणारा मान्सून यंदा तब्बल आठ दिवस आधीच विदर्भात दाखल झाला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 11 ते 13 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा आंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईसह राज्यातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण आणि मुंबईत मानसून दाखल झाल्यानंतर आठवडाभराने मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. मात्र यंदा मान्सूनची गती चांगली असल्यामुळे तब्बल आठ दिवसांपूर्वीच मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. मान्सून विदर्भात दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.