नागपूर : सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ( Anti corruption wing of CBI ) नागपूर आयकर विभागाच्या 9 अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे की 2012-14 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ( dummy candidates in the Staff Selection Commission ) परीक्षेत डमी उमेदवारांना बसवले होते. सीबीआयने याप्रकरणी 2018 मध्ये गुन्हा दाखल केला आला होता. तब्बल चार वर्षे तपास केल्यानंतर आरोपींविरोधात भक्कम पुरावे सापडल्यानंतर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -अटक करण्यात आलेल्यामध्ये रिंकी यादव, स्टेनोग्राफर (ग्रेड-II), सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार, मनीष कुमार आणि धर्मेंद्र कुमार यांचा समावेश ( 9 officials of Nagpur Income Tax Department ) आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने 6 मार्च 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता. आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १३ (२) आर/डब्ल्यू १३ (१) (ड) अन्वये कारवाई करण्यात ( CBI arrested 9 officials of Nagpur ) आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने 2012-14 मध्ये घेतलेल्या भरती परीक्षेत हे अधिकारी बसले नाहीत. तर परीक्षेला बसण्यासाठी डमी उमेदवारांची व्यवस्था केली आणि कर्मचारी निवड आयोगाची दिशाभूल केली. वर्षानुवर्षे यातील काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीही मिळाली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले