मुंबई -राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Nagpur Winter Session ) शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Anil Parab Criticize To Government ) यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेवेळी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल ( FIR Against Opposition Party Leaders ) केला. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात, मात्र सत्तेमधील नेत्यांना पाठीशी ( Pardon For Ruler Party ) घातले जाते. हा कोणता न्याय, अशा शब्दात परब यांनी सरकारला जाब विचारला. त्यामुळे अनिल परब हे अंतिम आठवडा प्रस्तावावेळी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
सत्ताधारी करतात हात पाय तोडायची भाषाअनिल परब ( Anil Parab Criticize To Government ) म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी लोक प्रतिनिधी लोकांचे हात पाय तोडायची भाषा करत आहेत. पोलीस स्टेशनच्या आत गोळीबार केला जातो. त्याच्यावर गुन्हा ही दाखल झाला आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. एका मंत्र्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. परंतु, त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. उलट शाब्दीक चकमक झाल्याचा ठपका ठेवत, नितीन देशमुखांना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोर्टापर्यंत धावावे लागते. विरोधी पक्षाचे कोणीही काही बोलले तरी त्याला लगेच पोलीस कोठडीत ( FIR Against Opposition Party Leaders ) टाकले जाते, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला. तसेच कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. आम्ही गुन्हेगारी केली असेल तर आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांनी गुन्हे करून त्यांचे गुन्हे माफ करण्यात येत असतील तर अशा प्रकारचा न्याय तुम्हाला देता येणार नाही, अशी टीका अनिल परब यांनी केली.