नागपूर :समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपूर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहे, असे देखील ते म्हणाले आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. हे फक्त ४० आमदारांना सांभाळण्यासाठी होत आहे. कोणाला मंत्री करायचे? हे त्यांचे विषय आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
एकेरी भाषेतील वक्तव्य करू नये : राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात बोलताना एकेरी शब्दात बोलणे हे योग्य नाही. सुधीर मुनगंटीवार राज्यातील वरिष्ठ नेते आहे. त्यांनी शरद पवार याच्याबद्दल असे एकेरी भाषेतील वक्तव्य करू नये. खासदार तुमाने ह्यांनी ही अजित पवार यांच्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, अजित पवार यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. तुमाने यांना आरोप सिद्ध करण्याचे आवाहन अजित पवार यांनी दिले आहे. ते खासदार तुमानेंनी आवाहन स्वीकारावे आणि आरोप सिद्ध करून दाखवावे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.