नागपूर- सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) बाबत शरद पवार यांनी जी भूमिका ठेवली आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो की, महाराष्ट्रातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
'मी गृहमंत्री म्हणून सांगतो की.. महाराष्ट्रातील एकाचेही नागरिकत्व जाणार नाही'
महाराष्ट्रात आता 3 पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून जो निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वाना मान्य राहिल.
अनिल देशमुख
यावेळी देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात आता 3 पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून जो निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वाना मान्य राहिल. तिन्ही पक्षातील प्रमुख मंडळी एकत्र बसतील आणि चर्चा करून सीएए आणि एनआरसीबाबत निर्णय घेतील, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.