महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी सौभाग्यवती मैदानात - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मैदानात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराला सुरूवात केली.

भाजपच्या महिला मेळाव्यात बोलताना अमृता फडणवीस

By

Published : Oct 14, 2019, 3:43 AM IST

नागपूर - सध्या राज्यात प्रत्येक राजकीय पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस देखील मागे नाहीत. अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराला सुरूवात केली.

अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराला सुरूवात केली


मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मैदानात आहेत. भाजप महिला आघाडीच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

हेही वाचा - आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर


खरं तर या मतदारसंघात मुख्यमंत्र्याच्या प्रचाराची गरज नाही. हा त्यांच्या माणसांचा मतदारसंघ आहे. मागच्या निवडणूकीपेक्षा जास्त मतांनी देवेंद्र निवडून येतील, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details