नागपूर- राज्य सरकारने रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना लॉकडाऊनमध्ये अच्छे दिन आले आहेत. परंतु, नागपूरमध्ये दारूची दुकाने उघडणार नाहीत, असा महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश काढूनही तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर गर्दी केली आहे. दारूची दुकाने उघडतील या भाबड्या आशेपोटी अनेक तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आज तरी दुकाने उघडतील...नागपुरात बंद दारूच्या दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी - रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी
नागपूर शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे येथे कुठलही शिथिलता देण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारीच स्पष्ठ केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील असे देखील मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
![आज तरी दुकाने उघडतील...नागपुरात बंद दारूच्या दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी Nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7053220-632-7053220-1588577263283.jpg)
तळीरामांचा हिरमोड
नागपुरात बंद दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन आजपासून सुरु झाला आहे. लॉकडाऊन 3 मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोन निहाय काही शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे येथे कुठलही शिथिलता देण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारीच स्पष्ठ केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील असे देखील मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.