महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदेशीची चव देशीत, धान्यापासून देशी दारू बनवायला सरकारची मान्यता - दारुबंदी

विदेशी दारुची चव आता देशी दारुमध्ये मिळणार आहे. ज्याप्रमाणे धान्यापासून विदेशात दारु बनवली जाते. त्याचधर्तीवर राज्यात देखील देशी दारु तयार केली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे निदान दारू पिणाऱ्यांचे तरी 'अच्छे दिन' येणार आहेत.

उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Sep 20, 2019, 2:56 PM IST

नागपूर- विदेशी दारूची चव आता देशी दारूमध्ये मिळणार आहे. कारण ज्याप्रमाणे धान्यापासून विदेशात दारू बनवली जाते. त्याचधर्तीवर राज्यात देखील देशी दारू तयार केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे निदान दारू पिणाऱ्यांचे तरी 'अच्छे दिन' येणार आहेत.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना बावनकुळे

ऊसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे या मळीचा वापर हा जास्तीत जास्त इथेनॉलसाठी व्हावा यासाठी धान्यापासून दारू निर्मिती करण्यात येणार आहे. देशी दारूच्या निर्मितीसाठी अतिरिक्त असलेल्या धान्याचा वापर होणार आहे. ज्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना आहे, त्यांना आता धान्यापासून तयार केलेली चांगल्या दर्जाची देशी दारू मिळणार आहेत. मात्र मद्य पिण्याचा परवाना किती लोकांकडे आहे आणि त्याची अंमलबजावणी किती मद्य विक्रेता करतात हे महत्त्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details