अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातही वादाची ठिणगी - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचे गालबोट लागले आहे. या नाट्यसंमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगरचा किल्ला डावलले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्य संमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली.
नागपूर -शहरात उद्यापासून (शुक्रवार) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरू होत आहे. मात्र, यवतमाळच्या साहित्य समंलेनानंतर या संमेलनातही वादाची ठिणगी पडली आहे. संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावलल्याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिला आहे
९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचे गालबोट लागले आहे. या नाट्यसंमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगरचा किल्ला डावलले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्य संमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली.
गुरुवारी झालेल्या बैठकीत समिती ठरवताना सन्मानजनक वागणूक दिली नाही. एवढेच नाही तर समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार दिला नसल्याचा आरोप महानगर शाखेकडे करण्यात आलेला आहे. त्यामुळे अखिल भारतीय नाट्य संमेलनात घटनात्मक मार्गाने विरोध करणार असल्याचा इशारा नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिला आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच रंगकर्मींचे आंदोलन रंगणार असल्याची चर्चा आहे.