नागपूर - मागील 10 वर्षांपासून खंड न पडू देता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रेरणा घेऊन मातृभूमी सेवा प्रतिष्ठानकडून 14 ऑगस्ट हा अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करतात. शहरातील सक्करदारा चौकात कोरोनाच्या निर्बंधामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थित सामूहिक वंदे मातरमचे गायन करुन साजरा करण्यात आला. यावेळी अखंड भारत संकल्प दिवस साजरा करण्यात आला.
मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मागील दहा वर्षात मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभल्याने या कार्यक्रमाचे स्वरूप मोठे झाले. यात कोरोनाच्या निर्बंधापासून मागील वर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला होता. यंदाही कोरोनामुळे कमी लोकात समूहिक वंदे मातरम गायन करत अखंड भारत होण्याचा संकल्प घेण्यात आला. यासोबत जोपर्यंत अखंड भारताचे स्वपं पूर्ण होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहिल, अशी भूमिका आयोजक डॉ. रवींद्र भोयर यांनी मांडली.