नागपूर- अजनी लोकोशेड हा भारतातील सर्वात उत्कृष्ट शेड ठरले आहे. त्या ठिकाणी पुशपूल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लोणावळ्यासारख्या घाट असणाऱ्या भागात जाणाऱ्या गाड्यांना हे इंजिन अधिक मदतीचे ठरत आहे. कारण हे इंजिन जोडल्याने गाड्यांचा वेग वाढला आहे. इतरही मार्गवारील गाड्यांना इंजिन जोडले जाईल, अशी महिती मध्य रेल्वेचे महाव्यापास्थापक डी. के. शर्मा यांनी दिली.
अजनी स्थानकावरील लोकोशेड भारतातील सर्वोत्तम - रेल्वे महाव्यवस्थापक
अजनी लोकोशेड हा भारतातील सर्वात उत्कृष्ट शेड ठरले आहे, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यापास्थापक डी. के. शर्मा यांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा
ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टिने महामेट्रोसोबत करार झाला आहे. त्यानुसार कोचेसची (डब्यांची) उपलब्धता करून देणेही मेट्रोची जबाबदारी आहे. मेट्रो कोचेस उपलब्ध करून देताच ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्यात येईल, अशीही महिती शर्मा यांनी दिली.