महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याची आर्थिक स्थिती समजून घेतल्यानंतरच कर्जमाफीचा निर्णय - अजित पवार - Nagpur latest news

महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफी करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Dec 19, 2019, 1:04 PM IST

नागपूर- राज्याची आर्थिक स्थिती समजून घेतल्यानंतरच सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. राज्याच्या एकूण सकल उत्पनाच्या अभ्यास केला जात आहे. सरकारवर किती कर्ज आहे आणि पुन्हा किती कर्ज घेता येऊ शकते, याचा आढावा घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार, राष्ट्रवादी नेते

महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफी करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही पवार म्हणाले.

गेल्या सरकारने कर्जमाफी दिली होती खरी पण ती द्यायला 3 वर्ष लावली होती. मात्र, आमच्या सरकारमध्ये कर्जमाफीची ही संपूर्ण प्रक्रिया 2 ते 3 महिन्यात पूर्ण केली जाईल. या शिवाय कर्जमाफी देताना जुन्या उर्वरित कर्जाची परतफेड केल्यानंतरच शिल्लक रकमेची कर्जमाफी देण्याची अट घालू नका, अशी मागणी केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details