नागपूर-दोन महिन्यांनंतर आजपासून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाली आहे . देशातील महत्वाच्या शहरातील विमानतळावरून विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही विमानांची ये-जा सुरू झाली आहे.
विमानसेवा सुरू, नागपूरच्या विमानतळावर उतरणार पाच विमाने
विमानसेवा सुरू झाली असली तरी यावर कोरोना इफेक्ट स्पष्टपणे जाणवतोय. आज नागपूरला आलेल्या विमानांमधून आलेल्या प्रवाश्यांची संख्या फारच कमी दिसून आली. आज नागपूर विमानतळावर 5 विमाने उतरणार आहेत.
आज विमानसेवा सुरू झाली असली तरी यावर कोरोना इफेक्ट स्पष्टपणे जाणवतोय. आज नागपूरला आलेल्या विमानांमधून आलेल्या प्रवाश्यांची संख्या फारच तुरळक असल्याचे दिसले. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसभरात पाच विमान उतरणार आहेत.
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळूर या शहरातून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. त्यानंतर ही पाच विमान ज्या शहरातून आले आहेत, त्याच शहरात परत जाणार आहेत. पाच शहरातून नागपूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या समजलेली नाही. विमानातून उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. सोबतच प्रवाशांच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण केले जातेय आणि आरोग्यासंदर्भात फॉर्म भरून घेतला जातोय.