नागपूर- मान्सून उशिराने येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर सुद्धा शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीच्या कामाला लागले आहेत. अशा वेळी बोगस बियाण्यांची विक्री करणारे सुद्धा सक्रिय झाले आहेत. मागील वर्षी कपाशीच्या बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणत विक्री झाली होती. असे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभाग उपाययोजना करणार आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नेमली आहेत.
खरीप हंगाम..! बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात नागपूरचा कृषी विभाग सज्ज - कृषी विभाग
शेतकऱ्यांची दिशाभूल करून बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नेमली आहेत. बियाणे अधिकृत कृषी केंद्रातूनच घ्यावी आणि त्याच पक्कं बिल घ्यावं. बिलाव्यतिरिक्त स्वस्तात बियाणे देणाऱयांकडून ते घेऊ नये. कृषी विभागाचा परवाना असणाऱ्या दुकानातूनच बियाणे घेण्याचा सल्ला देत शेतकऱ्यांनी सावधता बाळगण्याची गरज असल्याचं नागपूरच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करायला सुरुवात केली आहे. मात्र, स्वस्तात बियाणे देण्याच्या लालचे पोटी शेतकऱ्यांना अनाधिकृत बियाणे विकणाऱ्या टोळ्यादेखील सज्ज झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बियाणे अधिकृत कृषी केंद्रातूनच घ्यावी आणि त्याच पक्कं बिल घ्यावं.
बिलाव्यतिरिक्त स्वस्तात बियाणे देणाऱ्यांकडून ते घेऊ नये. असे बियाणे घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाचा परवाना असणाऱ्या दुकानातूनच बियाणे घेण्याचा सल्ला देत शेतकऱ्यांनी सावधता बाळगण्याची गरज असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.