महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

Agricultural Damage Inspection : नागपूर जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. (Agricultural Damage Inspection in Nagpur) नुकसानीची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी दिल्या. (Agricultural losses due to unseasonal rains)

Agricultural Damage Inspection
शेतीची पाहणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 6:36 PM IST

नागपूरAgricultural Damage Inspection:पीक नुकसानीच्या (CM Eknath Shinde) पाहणी दौऱ्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Deputy CM Devendra Fadnavis)


धानासह कापूस, तुरीचे नुकसान :नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा १२४ गावांना फटका बसला आहे. तर ८५२ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मौदा तालुक्यात रामटेक पारशिवणी तालुक्यात नुकसान झाले आहे. धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले. विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या :राज्यातील दुष्काळ,अवकाळी पाऊस, गारपीट, वादळामुळे शेतकरी उद्ध्ववस्थ झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे. शेतकरी संकटात असताना देखील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकत नाही, असा आरोप त्यांनी केल्यानंतर काही वेळातचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.

नरखेड, कळमेश्वर तालुक्यातही मोठे नुकसान: नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मिरची या पिकांना मोठा फटका बसला आहे. मौदा सोबतच नरखेड, कलमेश्वर, सावनेर आणि उमरेड तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसाने हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे.

हेही वाचा:

  1. राजकीय वादातून मागास जातीच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला, साहित्यासह वाहनांची तोडफोड
  2. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक बॅकफूटवर, सत्ताधाऱ्यांची 'ही' खेळी चर्चेत
  3. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार करणार मदत, देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनात आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details