महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओबीसी आरक्षण; देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

कोर्टाच्या आदेशानंतर ओबीसीचे आरक्षण रद्द झाले असून राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

By

Published : Jun 26, 2021, 11:06 AM IST

नागपूर- माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे नेतृत्वात आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भरून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहेत. नागपुरात व्हेरायटी चौकात हे आंदोलन होणार असून पोलिसांच्यावतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जवळपास दोनशे पोलिस कर्मचारी आणि 25 अधिकारी या बंदोबस्तात असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याच्या मागण्या
कोर्टाच्या आदेशानंतर ओबीसीचे आरक्षण रद्द झाले असून राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर यामध्ये आता ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने यात मुद्दा चिघळला आहे. या परिस्थितीत या निवडणुका रद्द व्हाव्यात, अशी भूमिका भाजपच्यावतीने घेण्यात आली आहे. यासाठी आज राज्यभरात जवळपास एक हजार ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या निवडणुका रद्द कराव्यात गरज पडल्यास राजसरकारने सुप्रीम कोर्टात जावे, अशी मागणी भाजपकडून केल्या जात आहे. यानंतरही निवडणुका रद्द होत नसल्यास भाजपकडून पूर्णच जागेवर ओबीसी उमेदवार उभे करून निवडणुकांना समोर जातील आशीही भूमिका घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details