नागपूर - करोना काळातील वीज बील माफ करावे या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शहरातील बैधनाथ चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेवर शाई फेकत, चप्पल मारत संताप व्यक्त करण्यात आला.
सरकार दिलेला शब्द पाळत नाही-
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार गेले आहेत. सर्वसामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. यात वीज बिल माफी देतो म्हणणारे सरकार मात्र, दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विदर्भात वीज निर्मिती केंद्र असतानाही जनतेला त्याचा लाभ घेता येत नसल्याचाही आरोप आंदोलन आंदोलनकर्त्यांनी केला
वीज बिल माफीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक केजरीवाल सरकारच्या धर्तीवर 200 युनिट माफ करावे
दिल्लीत केजरीवाल सरकारने २०० युनिट वीज बिल माफ केले आहे. केजरीवाल सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेही 200 युनिट माफ करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
उर्जामंत्र्यांच्या घराला घेराव घालणार-
वीज बील प्रश्नावरुन आंदोलक जास्त तापले आहेत. येत्या 4 जानेवारीला ऊर्जामंत्री नितिन राऊतांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
हेही वाचा-मोठ्या स्तरावर इथेनॉलचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना होणार फायदा - नितीन गडकरी
हेही वाचा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य यांच्या पार्थिवावर आज नागपुरात अंत्यसंस्कार