नागपूर - कोरोनाच्या काळात मनपातील 64 सुरक्षा रक्षकांना नोकरी वरून काढण्यात आले होते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने संबधित कंपनीचे कंत्राट रद्द केले होते म्हणून त्या सुरक्षा रक्षकांना नोकरीला मुकावे लागले. त्या सर्व 64 सुरक्षा रक्षकांना पुन्हा नोकरीवर रुजू करा, अशी मागणी 'जय जवान जय किसान संघटने'कडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी मनपा परिसरात आंदोलन करण्यात आले. शिवाय त्या सुरक्षा रक्षकांना कोणतेही कारण नसताना का काढण्यात आले? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. शिवाय गेल्या 20 वर्षापासून ज्या कंपन्या मनपात काम करत आहेत त्यांचे ऑडिट करा, अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली.
कोरोनाच्या या संपूर्ण काळात अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहेत. यात कित्येक लोकांच्या नोकऱ्यादेखील जात आहेत. अशातच नागपूरातही याच काळात मनपातील ६४ सुरक्षा रक्षकांना नोकरीवरुन काढण्यात आले. कोणतेही कारण नसताना त्या सुरक्षा रक्षकांना कामावरून का काढण्यात आले? असा सवाल उपस्थित करत दुसऱ्या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे.