नागपूर- पगार मिळायला होणार विलंब व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनामुळे अर्ध्या नागपूर शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन; नागपुरात कचऱ्याचे ढीग
कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कंपनीतर्फे अधिकारी आले होते. परंतु या चर्चेतून ठोस काहीही निष्पन्न न झाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी महापालिकेने दोन खासगी कंपन्यांना दिली आहे. महापालिकेच्या १० झोन पैकी प्रत्येकी पाच झोन या दोन कंपन्यांना विभागून दिले आहेत. यापैकी झोन क्रमांक ६ ते झोन क्रमांक १० या झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी या कंपनीकडे आहे. मात्र कंपनी शासन निर्णयानुसार कामगारांचे पगार करीत नाही, पगार देण्यास दर महिन्याला विलंब करते, १७ महिन्याचा अॅरीअर्स देण्यास विलंब यासह इतर आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंपनीच्या सुमारे ८५० कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनामुळे
चर्चेतून तोडगा निघाला नसल्याने संप
गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी या पाच झोन मधील कचरा उचलण्यात आला नाहीय. कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कंपनीतर्फे अधिकारी आले होते. परंतु या चर्चेतून ठोस काहीही निष्पन्न न झाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.