नागपूर - कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागून वर्ष लोटले आहे. शाळा बंद असल्याने लहान मुलांना जवळजवळ वर्षभर झाले घरातच राहावे लागले आहे. यामुळे शाळा, कॉन्व्हेंट यांनी त्यासाठी पर्याय शोधत ऑनलाइन माध्यमाच्या साह्याने शिक्षण दिल्या जात आहे. यासाठी लॅपटॉप आणि मोबाइल हे पर्याय समोर आले आहे. जे मोबाइल मुलांनी अभ्यास करावा म्हणून दूर ठेवले होते. तेच मोबाइल आता अभ्यास करण्यासाठी लहान मुलांच्या हातात द्यावे लागले आहे. मात्र वर्ष संपत आले, खरच मुलं अभ्यास करतात का? पालकांचं काय चाललंय जाणून घेऊ या वृत्तातून..
शाळा सुरू होऊन पुन्हा बंद
नागपूर शहरात कोरोनाचा प्रकोप मध्यंतरी कमी झाल्याने सुरुवातीला ४ जानेवारीला वर्ग ८ ते १२पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर लहान मुलांच्या शाळा फेब्रुवारी ७पासून सुरू झाल्या. मात्र शाळा सुरू होताच २३ फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा शाळा-महाविद्यालय बंद करण्यात आले.
चार भिंतीत काढले वर्ष
मागील वर्षात कोरोनाच्या संकटाने लहान मुलांना पालकांनी घराबाहेर पडू दिले नाहीत. यामुळे मुलांना वर्ष बंद घरात गेले. आता परिस्थिती थोडी सुधारणा झाली डांबलेली मुले किमान अपार्टमेंट खाली उतरून खेळू लागली आहे. पण खेळत असताना ऑनलाइन अभ्यासाच्या वेळेचे पालन करायला मुले शिकली आहेत. दिवसभर अभ्यास केल्यानंतर ते इतर कामे करायला शिकली आहेत.