नागपूर- कोरोना महामारीने गेले दीड वर्ष सर्वांसमोर संकट निर्माण केले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दीलासादायक चित्र सध्या निर्माण होत आहे. सोमवारी आलेल्या अहवालात पॉझिटिविटी दरात घसरण होत 2.2 टक्क्यांवर आला आहे. तेच रिकव्हरी रेट हा वाढवून 97.44 वर पोहचला आहे. यात नव्याने बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यात जवळपास 15 नोव्हेंबर पासून सहा महिन्यांनी शहरात नवे कोरोनाबाधित 54 मिळून आले आहेत. तेच ग्रामीण मध्ये मागील 24 तासात एकही मृत्यू नसल्याने शून्य मृत्यू अशी तीन दिवसात दुसऱ्यांदा नोंद झाली आहे.
साडेसहा महिन्यांनी शहरात बाधितांची संख्या कमी - nagpur corona cases
नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 6 हजार 016 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 134 कोरोना पॉझिटिव आले आहेत. यामध्ये शहरी भागात 54 तर ग्रामीण भागात 77 बाधित रूग्ण मिळून आले आहेत. तसेच 8 रुग्ण दगावले आहेत.
नागपूर जिल्ह्या बाधितांची संख्या
6 जिल्ह्यात 16 रुग्ण दगावले
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 1 हजार 141 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 258 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 16 रुग्ण कोरोना आजराचे बळी ठरले आहेत. बाधितांच्या तुलेनेत 856 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहेत. नागपूरची पॉझिटिव रुग्णसंख्या दर 2.2 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 1.79 पर्यंत आली आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनावरील बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणी दोघांना अटक, २२ लाखांचे औषध जप्त