नागपूर - नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोचली आहे. या परिस्थितीसाठी प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.
'नागपुरात कोरोनारुग्णांची संख्या वाढण्यास प्रशासनाचा गलथान कारभारच जबाबदार' - रुग्णांची संख्या वाढण्यात प्रशासनाचा गलथान कारभारच जबाबदार- संदीप जोशी यांचा आरोप
बहुतांश रुग्ण हे विलगीकरण कक्षातीलच आहेत. कोरोना संशयितांना हाताळताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अवश्याक आहे. नागपुरातील आमदार निवास येथे कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र विलागीकरणात ठेवलेले संशयित सहलीसाठी आल्यासारखे वागत असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी असलेले संशयीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. ज्याचे गंभीर परिमाण भविष्यात आपल्याला भोगावे लागतील. प्रशासनने सर्वात आधी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयीतांचे वर्गीकरण करणे गरजेचे होते. सर्वांना एकत्र ठेऊन प्रशासन मोठी चूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.