नागपूर - मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेते आणि खासदार सनी देओल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सनी देओल यांनी आपल्या अंदाजात देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला.
"हिंदुस्थान जिंदाबाद था, हिंदुस्थान जिंदाबाद है और रहेगा" सनी देओलच्या डायलॉगने विद्यार्थ्यांची मने जिंकली - सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम nagpur
मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेते आणि खासदार सनी देओल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी सनी देओल यांनी आपल्या अंदाजात देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला.
काश्मीरमधून 370 कलम हटवल्यामुळे या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्व असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारत अखंड राहवा यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच कार्य करावे, असे गडकरींनी आवाहन केले. तर अभिनेता सनी देओल यांनी त्यांच्या फिल्मी शैलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जोश निर्माण केला.
नागपुरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी सामूहिक वंदे मातरम गायले. कार्यक्रमादरम्यान माजी सैन्य अधिकाऱ्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री गडकरी व सनी देओल यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्याआधी सगळा भारत एक होता, जात पात नव्हती, फक्त भारताचे स्वातंत्र्य हेच लक्ष होते असे त्यांनी सांगितले. यावेळी सनी देओल यांनी आपल्या शैलीत "हिंदुस्थान जिंदाबाद था, हिंदुस्थान जिंदाबाद है और रहेगा" या डायलॉगने विद्यार्थ्यांची मने जिंकली.