नागपूर -महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत भाजपला अडचणी येत आहेत. हे अरिष्ट टळून देवेंद्र फडणवीसच पून्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विपीन तेलगोटे यांनी सुमारे दोन किलोमीटरचे अंतर लोटांगण (दंडवत प्रमाण) करत पार करून टेकडी गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ पडावी याकरिता प्रार्थना केली आहे.
ते पुन्हा यावेत..! फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी निकटवर्तीयाचे लोटांगण - Workers of C.M Fadnavis prayed for post of C.M
महाराष्ट्रत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे भाजप अडचणीत येत आहे. हे अरिष्ट टळून देवेंद्र फडणवीस पून्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विपीन तेलगोटे यांनी टेकडी गणेशाचे दोन किलोमीटर अंतर लोटांगण घालत दर्शन घेतले
विधान भवन चौकातून विपीन तेलगोटे यांनी दंडवत घालायला सुरुवात केली. यावेळी फडणवीस समर्थक त्यांच्या सोबत होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केलेले आहे. त्यांना पुन्हा संधी मिळावी याकरिता नागपुरातील अनेक भाजप कार्यकर्ते देवाला साकडं घालत आहेत. त्याचप्रमाणे विपीन तेलगोटे यांनी दंडवत घालून आपली मागणी व्हाया देवा थ्रू शिवसेनेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेना मुख्यमंत्री पदाकरिता अडून बसली असल्याने विपीन तेलगोटे यांची प्रार्थना पूर्ण होईल की नाही? याचे उत्तर पुढील काही तासात, किव्हा दिवसात मिळू शकेल.