नागपूर -नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एलपीके-9 नामक बार आणि रेस्टॉरंटने केलेले अतिक्रमण पाडण्यात आले आहे. या बार मालकांनी सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवत संबंधित कोणत्याही विभागाची परवानगी न घेता बांधकाम केले होते. समाजकंटकांचा हा अड्डा बनल्याने अनेक वेळा पोलिसांनी या ठिकाणी छापे देखील टाकले होते. त्यावेळी अवैध धंदे सुरू आल्याचे निदर्शनात आले होते. त्यानंतर यासंदर्भात एनएमआरडीएकडून अतिक्रमण पाडण्याच्या सूचना केल्या होता. त्यानुसार आज पोलिसांच्या बंदोबस्तात एलपीके-9 बार पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : समाजकंटकांचा अड्डा बनलेल्या एलपीके-9 बारवर अतिक्रमण विभागाचा बुलडोझर - नागपूर पोलीस बातमी
सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवत संबंधित कोणत्याही विभागाची परवानगी न घेता बांधलेल्या एलपीके-9 बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

नागपूर शहरात दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस विभागाकडे येत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात ज्या ठिकाणी अशा प्रकारे अवैध धंदे सुरू आहे. यासंदर्भात चाचपणी सुरू केली होती. अवैध कामांकरिता एलपीके-9 नामक बार आणि रेस्टॉरंट बदनाम असल्याने पोलिसांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे या संदर्भात विचारणा केली असताना या बारचे निर्माण कार्य अवैध आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज या बारवर बुलडोझर चालवण्यात आल्याची माहिती नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.
समाजकंटकांचा वावर
एलपीके-9 नामक बार आणि रेस्टॉरंट शहराबाहेर असल्याने अनेक गुंडांचा त्या ठिकाणी वावर असायचा. पोलिसांनी अनेक वेळा या ठिकाणी छापे टाकल्या, तेव्हा पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी त्या ठिकाणी आढळले होते. शिवाय हे हॉटेल अय्यशीचा अड्डा असल्याचे देखील अनेक वेळा पुढे आले आहे.
हेही वाचा- २०२०च्या पहिल्या अंतराळयात्रेसाठी इस्रो सज्ज! 'पीएसएलव्ही सी४९' चे काऊंटडाऊन सुरू