महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 16, 2021, 7:54 PM IST

ETV Bharat / state

नागपूर : संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी कडक कारवाईला सुरुवात

नागपूरमध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकांनी नियमाचा भंग केल्याचे दिसून आले. मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकात कडक बंदोबस्त लावला होता. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होताना दिसून आले.

action-taken-by-police-on-second-day-of-curfew-in-nagpur
नागपूर : संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी कडक कारवाईला सुरुवात

नागपूर -राज्य सरकारने कडक निर्बंध जाहिर केल्यानंतर पहिल्या दिवशी नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकांनी नियमाचा भंग केल्याचे दिसून आले. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकात कडक बंदोबस्त लावला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली गेली. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होताना दिसून आले.

प्रतिनिधीचा रिपोर्ट

विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. परंतु पहिल्या दिवशी अनेकांनी या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे आज पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली. तसेच प्रत्येक गाडीची विचारपूस पोलिसांकडून केली जात होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांच्या नावाची नोंद सुद्धा पोलीस विभागाकडून घेतली गेली.

हेही वाचा - उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details