महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध मद्यपान करणाऱ्या ३३ लोकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापा सत्र सुरू आहे. २ दिवसांत मद्य प्राशन करण्याचा परवाना नसलेल्या ३३ लोकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

nagpur
अवैध मद्यपान करून झिंगणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

By

Published : Dec 12, 2019, 3:51 PM IST

नागपूर - शहरात अवैधरित्या मद्यप्राशन करून फिरणाऱ्या ३३ लोकांवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली आहे.

अवैध मद्यपान करून झिंगणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापा सत्र सुरू आहे. नागपुरातील गुरुदेवनगर परिसरात एनआयटी गेटपुढे अवैद्य मद्यपान करणाऱ्या लोकांवर ही करवाई करण्यात आली आहे. २ दिवसांत मद्य प्राशन करण्याचा परवाना नसलेल्या ३३ लोकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल आहे.

मद्य प्राशन करून भर रस्त्यात झिंगणाऱ्या आणि रहदाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या मद्यप्रेमींवर कारवाई करण्यात आली आहे. या परिसरात १०० ते २०० लोक नशेत बसलेली असतात. याचा त्रास परिसरातील लोकांना होतो, अशी तक्रार नागरिकांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत मद्यप्राशन करणाऱ्यांवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्यरित्या वैद्यकीय तपासणी करून करवाई केली आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र? २५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

हेही वाचा - 'टायगर कॅपीटल'मध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू, ८ दिवसातील दुसरी घटना

ABOUT THE AUTHOR

...view details