नागपूर :बिहारच्या भागलपूर पोलिसांना खुलं आव्हान देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी अटक केली. गेल्या पाच वर्षांपासून हा आरोपी नागपूर शहरातील मोमीनपुरा भागात लपून राहत होता. बिहार येथून फरार झाला तेव्हा मला कोणतेही पोलीस अटक करू शकणार नाहीत, असे चॅलेंज भागलपूर पोलिसांसह तेथील एसपीला सोशल मीडियावरून दिले होते. 'राखा को पकड कर दिखाओ, राखा वापस आ रहा है, हिसाब लेने के लिए', असे चॅलेंज त्याने एसीपीला दिले होते. राखा तनवीर असे त्या आव्हान देणाऱ्या गुंडाचे नाव आहे. त्याचे खरे नाव मोहम्मद तनवीर मंजूर आलम असे आहे.
प्रदीप रायणवार- पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा पोलिसांना आव्हान देऊन राखा अंडरग्राऊंड
आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कुख्यात गुंड किंवा आरोपींकडून एखाद्या पोलीस अधिकारी किंवा थेट पोलीस यंत्रणेला आव्हान दिल्याचे दृश्य अनेकदा चित्रपटात बघायला मिळते. मात्र बिहार येथील एका आरोपीने अशा चित्रपटांमधील डायलॉगचा वापर करून भागलपूर येथील पोलीस अधीक्षकाला (एसीपी) आव्हान दिले होते. "राखा को पकड कर दिखा दो...राखा वापीस आ राहा है...हिसाब 'किताब लेने के लिए... राखा तनवीर" असा मॅसेज सोशल मीडियावर वायरल केल्या आणि हा गुंड अंडरग्राऊंड झाला.
पोलिसांनी चॅलेंज स्विकारलं अन्...
मात्र त्या गुंडाचा वावर नागपुरात असल्याची खात्री नागपूर पोलिसांना पटली. यानंतर नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गुंड राखा तनवीरला अटक केली आहे. त्याचे खरे नाव मोहम्मद तनवीर मंजूर आलम असे आहे.
"भागलपूर के एसपी को खुला चॅलेंज, राखा को पकड कर दिखाओ..राखा वापीस आ राहा है.. हिसाब 'किताब लेने के लीय...राखा तनवीर" असा मेसेज आरोपी राखाने बिहारच्या भागलपूर पोलीस अधीक्षकांना पाठवला. ज्यामुळे भागलपूर जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. बिहार पोलrस गेल्या अनेक वर्षांपासून राखाचा शोध घेत होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एसपीला चॅलेंज केले. यानंतर तेथील पोलिसांनी राखाचा नव्याने शोध सुरू केला. तेव्हा या कामात तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. आरोपी राखाचे लोकेशन नागपूर येथे दाखवत असल्याने याबाबत नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना या संदर्भात सूचना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला मोमीनपुरा येथुन अटक केली आहे.
राखा दोन वर्षांपासून नागपुरात वास्तव्यास
मोहम्मद तनवीर मंजूर आलम हा आरोपी राखा तनवीर नावावे भागलपूर येथे प्रसिद्ध आहे. बिहारमध्ये त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस अटक करण्यापूर्वीचा तो फरार झाला होता. मागील दोन वर्षांपासून तो नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात लपून बसला होता. या काळात त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी राखाला अटक केल्यानंतर भागलपूर पोलिसांना याची सूचना दिली आहे.
हेही वाचा -Video: दिल्लीत न्यायालयातच गोळीबाराचा थरार, कुख्यात गुन्हेगारासह ३ ठार