नागपूर: नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जुनी परिसरात विहिरीचे पाणी भरण्यावरून एकाने स्वतःच्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक हरिओम शाहू असे (४०) हत्या झलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत मृतक अभिषेकच्या कुटुंबातील 3 जण जखमी आहेत. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. Nagpur Crime यामध्ये मृतकचा चुलत भाऊ शुभम महेश शाहू (२१) याचा देखील समावेश आहे.
Nagpur Crime: भाऊ बनला पक्का वैरी; विहीरीचे पाणी भरण्याच्या वादातून हत्या, आरोपींना अटक - विहिरीचे पाणी भरण्यावरून
Nagpur Crime: नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जुनी परिसरात विहिरीचे पाणी भरण्यावरून एकाने स्वतःच्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक हरिओम शाहू असे (४०) हत्या झलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत मृतक अभिषेकच्या कुटुंबातील 3 जण जखमी आहेत.
तलवारीने हल्ला:मृतक अभिषेक यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. नवीन बांधकाम करताना पाणी पाहिजे असल्याने अभिषेक यांनी विहीरीवर पाण्याची मोटर बसवण्याचे काम सुरू केले होते. त्याचवेळी आरोपी शुभम हा तिथे आला आणि अभिषेक सोबत वाद घालू लागला होता. Nagpur Crime बघता बघता वाद हा इतका विकोपाला गेला की, शुभमने तलवारीने अभिषेकवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये अभिषेकचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतक अभिषेकचे आई वडील जखमी आरोपी शुभमने अभिषेकवर तलवारीने हल्ला केल्यानंतर अभिषेकचे आई- वडील आणि भाऊ मध्यस्थीसाठी धावले असता आरोपीने त्यांना देखील मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतकचा चुलत भाऊ शुभम महेश शाहू आणि अन्य 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. Nagpur Crime या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.