नागपूर : इमरान खट्टा ( वय २६) असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर गोवंश तस्करीचा आरोप होता, अशी माहिती पुढे आली आहे. इमरान खट्टा विरोधात नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्यात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेण्याकरिता देवलापार पोलिसांचे एक पथक नागपुरमध्ये आले होते. त्याचदरम्यान आरोपी इमरान खट्टा हा उप्पलवाडी या भागात लपून असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे देवलापार पोलीस उप्पलवाडी भागात दाखल झाले. इमरान खट्टा ज्या इमारतीत लपलेला होता, त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले ही बाब समजल्यानंतर इमरानने थेट इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली.
इमरान खट्टा गंभीर जखमी :थेट इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारल्यामुळे आरोपी इमरान खट्टा गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या भीतीपोटी इमरान खट्टा याने इमारतीवरून उडी घेतल्याचे समजल्यानंतर उप्पलवाडी भागातील स्थानिक आक्रमक झाले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. गोवंश तस्करीचा आरोपी इमरान खट्टा कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपलेला आहे. माहिती समाजल्यानंतर देवलापार पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर धाड टाकण्याचे नियोजन केले. इमरानला पकडताना झालेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत तो खाली पडला, त्यामुळे इमरानचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.