महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस वसाहतीमध्येच चोरी; कोविड सेंटरमधून २३ पंख्यासह अनेक वस्तू लंपास करणार अटकेत

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या क्वारंटाईन सेंटर मधून त्याने एकदा चोरी केली नाही, तर सलग अनेक आठवडे तो तिथे हाथ साफ करत होता. या चोरट्याने क्वारंटाईन सेंटर मधून तब्बल २३ पंखे, ३ पलंग, ३ गाद्या, काही आरसे, काही नळांच्या तोट्या आणि इतर किरकोळ साहित्य लंपास केले. मात्र, थेट पोलिसांच्या वसहतीत चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे.

पोलीस वसाहतीमध्येच चोरी
पोलीस वसाहतीमध्येच चोरी

By

Published : Jun 3, 2021, 12:31 PM IST

Updated : Jun 3, 2021, 1:53 PM IST

नागपूर -पाचपावली पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या नवनिर्माण पोलीस वसाहतीच्या इमारतीमध्ये कोविड क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्येच चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सेंटरमधील २३ पंखे, चार पलंग आणि काही गाद्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने या कोविड सेंटर मध्ये कुणीही नसल्याचा चोरट्यांनी गैरफायदा घेत चोरट्यांने एक-एक करत साहित्य चोरी करायला सुरुवात केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. विक्की उंदीरवाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस वसाहतीमध्येच चोरी

धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या वस्तू मधून चोरी करण्याचे धाडस करणारा हा चोरटा काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटर समोर कँटीन चालवत होता. आतील रुग्णांना जेवण नाश्ता देण्यासाठी त्याचे आत जाणे येणे होते. त्यामुळे आतील सर्व परिस्थितीची त्याला माहिती असल्याने त्याने नियोजितपणे ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्याने बरेचसे साहित्य विकल्याने ते हस्तगत करण्यात पोलिसांना अडथळे आले आहेत. मात्र पोलीस वसाहतीच्या मधील कोविड सेंटरमध्येच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या क्वारंटाईन सेंटर मधून त्याने एकदा चोरी केली नाही, तर सलग अनेक आठवडे तो तिथे हाथ साफ करत होता. या चोरट्याने क्वारंटाईन सेंटर मधून तब्बल २३ पंखे, ३ पलंग, ३ गाद्या, काही आरसे, काही नळांच्या तोट्या आणि इतर किरकोळ साहित्य लंपास केले. मात्र, थेट पोलिसांच्या वसहतीत चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे.

पोलीस वसाहतीमध्येच चोरी
पंखे विकताना आढळला चोर-


दोन दिवसांपूर्वी पोलीस कमाल चौक परिसरात गसतीवर होते. त्यावेळी त्यांना विक्की उंदीरवाडे हा तरुण संशयित अवस्थेत पाठीवर काही वस्तू घेऊन जाताना पोलिसांना दिसला. जेव्हा पोलिसांनी त्याची झडती घेतली, त्यावेळी त्याच्याकडे एक सिलिंग फॅन आढळून आला. विचारल्यावर त्याने तो पंखा पोलीस क्वार्टर मधून लंपास केल्याचे समोर आले. मग पोलिसांनी विक्कीची सखोल चौकशी सुरु केली.

पोलिसांच्या चौकशीत विक्कीने गेल्या काही दिवसांपासून २३ पंख्यांसह इतर साहित्य चोरल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून मोठ्या संख्येने चोरलेले पंखे व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. तर काही मुद्दमालाची विक्री केल्याचेही विक्कीने कबुल केले. मात्र, पोलीस वसाहतच सुरक्षित नसेल तर उर्वरित शहरात कायदा सुव्यवस्थेची दशा काय असणार अशी चर्चा नागरिकांमधून रंगू लागली आहे.

Last Updated : Jun 3, 2021, 1:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details