नागपूर -लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २०१९ या संपूर्ण वर्षभरात एकूण ११० ट्रॅप करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक छापेमारी पोलीस विभागावर घालण्यात आले. एकूण २२ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग आहे. महसूल विभागावर १९ वेळा छापेमारी करण्यात आली. पोलीस आणि महसूल विभागाचा लोकांशी थेट संबध येतो.
नागपूर पोलीस विभाग सर्वोधिक लाचखोर; एसीबीच्या २०१९ च्या अहवालात धक्कादायक खुलासा - Nagpur ACB News
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून २०१९ या संपूर्ण वर्षभरात एकून ११० ट्रॅप करण्यात आले. यात सर्वाधिक सापळे पोलीस विभागात लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यात एकून २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लाच घेण्यात नागपूर पोलीस विभाग अव्वल
लाच घेण्यात नागपूर पोलीस विभाग अव्वल
समस्या आणि तक्रार करण्याकरिता महसूल आणि पोलीस विभागात जाण्याचे प्रमाण जास्ती आहे. त्याचाच फायदा या विभागातील लोक घेतात, असा खुलासा या माहितीमधून होत आहे. लाच घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे लाच घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये तक्रारदारांचे आणि ट्रॅपींगचे प्रमाण कमी आहे. लाच घेणाऱ्यांविरोधात तक्रार करून देखील लाचखोरांचे प्रमाण कमी होत नाही, त्यामुळे तक्रार करणाऱ्यांची संख्या देखील मंदावली आहे.