नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात ४ टक्के वाढ झाली आहे. यामुळे नागपूरकरांवरचे जलसंकट टळण्याची शक्यता आहे. तर, तोतलाडोह धरणातला पाणीसाठा वाढल्याने शहरवासीयांचे जलसंकट दूर होणार, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
तोतलाडोह धरणात ४३ टक्के पाणीसाठा; नागपुरकरांवरचे जलसंकट टळले - चंद्रशेखर बावनकुळे
तोतलाडोह धरणातील जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठा ४ टक्के वाढ झाली आहे. यामुळे नागपूरकरांवरचे जलसंकट टळण्याची शक्यता आहे. तर, तोतलाडोह धरणातला पाणीसाठा वाढल्याने शहरवासीयांचे जलसंकट दूर होणार अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
तोतलाडोह धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नागपूरकरांवरचे जलसंकट टळणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. मात्र, आरक्षीत पाण्यापेक्षा जास्ती पाणी नागपूरकरांना मिळणार नाही असे देखील ते म्हणाले.
मागील काही दिवसात चांगला पाऊस पडल्याने मध्य प्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याचा फायदा तोतलाडोह धरणातील जलसाठा वाढण्यासाठी झाला आहे. मात्र, पूढच्या उन्हाळ्याचा देखील विचार लक्षात घेता पाणी बचत महत्वाची आहे. त्यामुळे सामान्य जनतेसोबतच उदयोजकांनीदेखील पाण्याचा अपव्यय टाळावा असे बाबावनकुळे म्हणाले.