महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar News : राधाकृष्ण विखे पाटील हे आतल्या गाठीचे मित्र- अब्दुल सत्तार

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी करिता खरीप हंगामाच्या पूर्व तयारीची आढावा बैठक आज बोलावण्यात आली होती. यामध्ये विभागात बियाणे, खत, कर्ज, वीज, पाणी या बाबींवर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या हंगामात बियाणे, खते यांची टंचाई होणार नाही असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

State Agriculture Minister Abdul Sattar
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार

By

Published : Apr 27, 2023, 9:00 PM IST

आढावा बैठकीत अब्दुल सत्तार माहिती देताना

नागपूर: आतापर्यंत अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. पावसाच्या नुसार पंचनामे लवकर पूर्ण होतील, अवकाळी पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर मंत्रिमंडळ किती नुकसान झाले आणि किती मदत देता येईल याबाबत विचार करणार आहे. राज्यात ४६ लाख हेक्टर शेतजमिनीवर अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या जून पासून आतापर्यंत अतिवृष्टी, परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हे नुकसान झाले आहे.आतापर्यंत विविध विभागात मदतीसाठी 12 हजार कोटी रुपये दिले आहेत. नुकसानीचे विमा कंपन्यांनी आतापर्यंत २ हजार ९०० कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले आहेत.



राधाकृष्ण विखे पाटील हे माझे मित्र: अमरावती आणि नागपूर विभागातील कृषी विभागातील रिक्त जागा शंभर दिवसांमध्ये भरण्यात येतील असे देखील ते म्हणाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांचे काम मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत सर्वात चांगले आहे. ते 18 तास काम करतात. अजित पावरांना काय वाटते हे मला माहित नाही, मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ चा आकडा गाठवा लागतो, शंकेचे काम नाही. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील हे माझे मित्र आहेत. विखे पाटलांची आमची दोस्ती २५ वर्षांपासून कायम आहे, पण एकनाथ शिंदे बदलवून विखे पाटलांना सीएम करा असे मी म्हणत नाही. तसेच संजय राऊतांचे डोके तपासून घ्यावे, आतपर्यंत ते जे काही बोलले ते खरे झाले का. त्यांचे बोलणे म्हणजे मुंगेरीलालचे हसीन स्वप्न आहे, असे देखील म्हणाले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील: शिंदे हे आमचे नेते आहेत, त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य होता आणि राहणार आहे. कोणी भाजपमध्ये आल्यास सरकारला काही फरक पडणार नाही, कोर्टात प्रकरण असल्याने जास्त बोलणे योग्य नाही, अजित पवार येणार की नाही, त्यानंतर आमची भूमिका काय राहणार यावर शिंदे निर्णय घेणार आहेत असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

हेही वाचा: Abdul Sattar In Beed नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची बीड जिल्ह्यात पाहणी

ABOUT THE AUTHOR

...view details