नागपूर - काटोल येथे वसतीगृह अधीक्षकाने एका 14 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अधीक्षक राजेंद्र काळबंडे (वय 44 वर्षे) यास पोलिसांनी अटक केली आहे.
इयत्ता सहावीत शिकणारी 14 वर्षीय पीडिता ही मागील पाच वर्षांपासून वसतीगृहात राहते. तीच्यावर मार्च महिन्यापासून नराधम अधीक्षकाने वारंवार बलात्कार केला. यातून ती गर्भवती झाली. त्यामुळे पीडितेच्या आईने व परिचारिकेने तीचा बळजबरीने गर्भपात केला. गर्भापात केल्यामुळे संबधित परिचारिका सिंधू देहनकर व पीडितेच्या आईसह तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.