नागपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांनी आज (शनिवारी) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. मुख्यमंत्री आता मुंबईकर झाले असल्याने त्यांना नागपूरची जनतेने परत पाठवण्याची पूर्ण तयारी केली असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला. आशिष देशमुख यांच्या रोड शो मध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, त्यातील बहुतांश कार्यकर्ते हेल्मेट घालायलाच विसरल्याचे चित्र बघायला मिळाले.
आशिष देशमुखांचा प्रचार, प्रचारादरम्यान वाहतूक नियमांची पायमल्ली हेही वाचा -पाऊस.. प्रचार अन् पवार...
गेल्या विधानसभेत भाजपच्या उमेदवारी वरून आमदार झालेले आशिष देशमुख यावेळी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात निवडणूक लढवत आहेत. यासाठी देशमुख यांनी स्वतःला संपूर्ण प्रचारात झोकून दिले असल्याने, एकतर्फी वाटत असलेल्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. प्रचाराचा आज (शनिवारी) अंतिम दिवस असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. तर मुख्यमंत्रांच्या महारॅलीला आशिष देशमुखांनी सुद्धा महारॅलीच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले.
हेही वाचा -या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केले; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर
यावेळी मुख्यमंत्री आता मुंबईकर झाले असल्याने त्यांना नागपूरची जनतेने परत पाठवण्याची पूर्ण तयारी केली असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. आशिष देशमुख यांच्या रोड शो मध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, त्यातील बहुतांश कार्यकर्ते हे हेल्मेट घालायलाच विसरल्याचे चित्र बघायला मिळाले.