नागपूर -आम आदमी पक्ष पुन्हा एकदा दिल्ली काबीज करणार हे निश्चित झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिल्लीमध्ये 'आप'चे सरकार येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागपुरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात जल्लोष केला आहे. यावेळी 'आप'च्या कार्यकर्त्यांनी 500 किलो मिठाई देखील वाटली. 'आप'चा विजय म्हणजे राम राज्याची नांदी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार; नागपूरमधील 'आप' कार्यकर्त्यांचा 500 किलो मिठाई वाटून जल्लोष हेही वाचा - #DelhiElections2020Live : आप 56 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा दमदार विजय मिळवला आहे. या निवडणुकीत हिंदूत्व किंवा इतर मुद्द्यांवर विकासाचा मुद्दा भारी पडल्याचे दिसत आहे. दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या कामावर विश्वास दाखवला आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेससाठी हे निकाल धक्कादायक आहेत. अरविंद केजरीवाल यांनी कामाच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली असून ही रामराज्याची नांदी असल्याचा दावा आपचे कार्यकर्ते करत आहेत. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या दिल्लीला आर्थिक सक्षमता दिल्यामुळेच हा प्रचंड विजय मिळाल्याचा दावा करत आप कार्यकर्त्यांनी नागपुरातील कार्यालयात जोरदार जल्लोष केला आहे.
हेही वाचा - शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना