नागपूर - उमरेड शहराजवळ वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. उमरेड-मकरधोकडा मार्गालगतच्या झुडपात रविवारी (दि. 13 मार्च)रोजी सायंकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आला. (Death tiger In Nagpur District) मृतावस्थेत आढळलेल्या नर वाघाचे वय अंदाजे अडीच वर्ष आहे. तो उमरेड शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर मधुबन कॉन्व्हेंटपासून काही अंतरावर मृतावस्थेत दिसून आला.
वाघोबा दिसताच प्रथमदर्शनी वाघ जिवंत असल्याचे भासले
शेतकरी मारोती कदरेवार यांची त्या भागात शेती असून लगतच्या झुडपी भागात ते गेले. त्यावेळी त्यांना वाघ आढळून आला. वाघोबा दिसताच प्रथमदर्शनी वाघ जिवंत असल्याचे भासल्याने रस्त्याच्या दिशेने पळत सुटले. (Death of a tiger In Umared) त्यानंतर याची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाला वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहचून पाहणी केली तेव्हा वाघ मृतावस्थेत असल्याचा समोर आले.
वाघाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट
प्राथमिक दृष्ट्या वाघाचा अंगावर जखमा आढळून आल्या असून टेरोटरी निर्माण करण्याच्या वाघाचा झुंजीत मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात वाघाचा मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदना अहवालानंतर कळेल असे सांगण्यात आले आहे. या परिसरात पहिल्यांदाच वाघ आढळून आला.
दुसरा वाघही या परिसरात वावरत असल्याची शक्यता
केवळ १०० मीटर अंतरावर शाळा आहे. वाघाचा मृत्यू झुंझ झाल्याने झाला असेल तर दुसरा वाघही या परिसरात वावरत असल्याची शक्यता आहे. रविवारी सूर्यास्त झाल्याने अंत्यसंस्कार होत नसल्याने सोमवारी सकाळी वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शना साह्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या नेतृत्वात उमरेडचे वनपरिक्षेत्राधिकारी ए. के. मडावी, दक्षिण उमरेडचे वनपरिक्षेत्राधिकारी कोमल गजरे यांनी पुढील चौकशी करत आहे.
हेही वाचा -Accident in Toronto, Canada : टोरंटोमध्ये झालेल्या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू